Posts

Showing posts from July, 2019

2019-20 शेतकरी क्रुषी कवी संमेलन

Image
शेतकरी क्रुषी कवी संमेलन लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात  कृषी दिनानिमित्त कृषी-कवी संमेलनाचे आयोजन प्रवरानगर दि.३ जुलै, २०१९ : सर्वच बाबतीत अनुकुलता असलेल्या भारत देशाकडे सर्वजगातील लोक  आकर्षित होतात. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने भारताला शेतीप्रधान देश म्हटलं जाते,  परंतु राजकारण,समाजकारण आणि अध्यात्मामध्येही शेती  बद्द्ल  प्रेम व्यक्त केलं जात असले तरी, नवीन पिढीचे  शेती बाबतचे  आकर्षण कमी होत असल्याची खंत प्रसिद्ध साहित्यिक आणि कवी  डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केली.           लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात  कृषी दिनानिमित्त कृषी-कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटपन प्रसंगी  डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते.  कार्यक्रमासाठी कृषी विद्यापीठाच्या रा. से. यो चे कार्यक्रम अधिकारी आणि कवी महाविरसिंग चव्हाण  प्रवरा परिसरातील शब्द्धश्नेही शब्दस्नेही चे  अध्यक्ष्य  कवी भास्कर दादा लगड, ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार प्राप्त...

प्रथम क्रमांक कविता ( शेतकरी क्रुषीकविसंमेलन )

               चिंता मन लागेना मळ्यात नाही थेंबही तळ्यात भयाण ह्या दुष्काळाचा सूर कोरडा गळ्यात            कधी येईल पाऊस               नाही कसली चाहुल              रानाकडे चालण्याला              नाही तयार पाऊल उन्हाळ्यात तापलेली सारी ढेकळं उभीचं वाट पाहुन थांबली स्वप्न मनात मुकीचं                डोळे लागले आकाशी               भुई भेगाळली सारी               हात डोक्याला चिंतेचा              संकट हे दारोदारी कष्ट करून तिन्हला जीव हैराण उपाशी आरसाचं फुटलेला बोले फाटक्या सुपाशी                               कु. भालेराव रूतुजा रोहिदास

व्यापारी शेत-करी

 शेती व्यवसाय होता, बळीराजा व्यावसायिक होता तू,  मातीचा देह तुझा रुद्धय पाझरते तुझे व्यापारी नाही होऊ शकला तू?   शेतीचे झाले व्यापारीकरण, विठ्ठल होता तू  विठ्ठलच राहिला, व्यापारी नाही होऊ शकला तू?   शेतमाल विकण्यासाठी जेव्हा बाजार मांडतो तू,  विकण्यासाठी आवाजाचा आकांडतांडव करतो तू,  ग्राहक जेव्हा देवासारखा तुज्या समोर येतो,  हात जोडून खुशाल दोन पैसे कमी घेतो तू?  दुकानात गेलास तर, व्यापारीच्या भिंतीवर असते  आज नगद कल उधार तू, परंतु तुझे उलटे असते  सगळे बाबा जसे आज उधार, कल नगद घेतो तू?  शेतमालाचा बाजार भाव वाढला, कणा ताठ  मानेने उभा राहतो तू, शेतमाल बाजार भाव पडला डोळ्यात पाणी आणून रडतो तू? आधुनिक शेत आणि व्यापार आपल्या मुलांना यावा यासाठी कृषी महाविद्यालयात त्यांना घालतो तू,  परंतु शिक्षण घेऊन जेंव्हा मुलगा तुला सोडून  जातो तरी आशीर्वाद देतो तू?   उतणार नाही मतणार नाही घेतला वसा टाकणार  नाही एकटाच लढतो तू, परंतु लढता लढता मृत्यू ...

  अरे आभाळा कधी फुटेल तूला पाझर

 दुष्काळ अरे आभाळा कधी फुटेल तूला पाझर  कधी भरेल माझ्या मायभूमीची घागर  तडे गेले रे जमिनीला   काळजालाही जाईल  माझी कारभारीण सुख  तरी कधी पाहिल  तुझ्या पाई गेला  माझा सखा देवाघरी  कधी करशील तू  माझ्या माय मातीची पंढरी   अरे आभाळा कधी फुटेल तूला पाझर   कधी भरेल माझ्या मायभूमीची घागर   अव्वल आला रे महाराष्ट्र   शेतकरी आत्महत्येत  तरी आमचे गुन्हेगार   आहेच कायम सत्तेत  कष्ट करुन थकलेत  आमचे बाहू अरे  आभाळा कधी फुटले तूला पाझर  कधी भरेल माझ्या मायभूमीची घागर  चातकापरी बघतो  मी पावसाची वाट कधी भेटेल  माझ्या पोरांना  सुखाचा घास   करतात लोक   पाण्याच राजकारण   त्यापाई तर होतय आमचं मरण  अरे आभाळा कधी फुटेल तूला पाझर  कधी भरेल माझ्या मायभूमीची घागर   रुक्ष गेला रे आषाढ  रुक्ष गेला हा श्रावण  ...