प्रथम क्रमांक कविता ( शेतकरी क्रुषीकविसंमेलन )
चिंता
मन लागेना मळ्यात
नाही थेंबही तळ्यात
भयाण ह्या दुष्काळाचा
सूर कोरडा गळ्यात
कधी येईल पाऊस
नाही कसली चाहुल
रानाकडे चालण्याला
नाही तयार पाऊल
उन्हाळ्यात तापलेली
सारी ढेकळं उभीचं
वाट पाहुन थांबली
स्वप्न मनात मुकीचं
डोळे लागले आकाशी
भुई भेगाळली सारी
हात डोक्याला चिंतेचा
संकट हे दारोदारी
कष्ट करून तिन्हला
जीव हैराण उपाशी
आरसाचं फुटलेला
बोले फाटक्या सुपाशी
कु. भालेराव रूतुजा रोहिदास
Comments
Post a Comment