अरे आभाळा कधी फुटेल तूला पाझर
दुष्काळ
अरे आभाळा कधी फुटेल तूला पाझर
कधी भरेल माझ्या मायभूमीची घागर
तडे गेले रे जमिनीला
काळजालाही जाईल
माझी कारभारीण सुख
तरी कधी पाहिल
तुझ्या पाई गेला
माझा सखा देवाघरी
कधी करशील तू
माझ्या माय मातीची पंढरी
अरे आभाळा कधी फुटेल तूला पाझर
कधी भरेल माझ्या मायभूमीची
घागर
अव्वल आला रे महाराष्ट्र
शेतकरी आत्महत्येत
तरी आमचे गुन्हेगार
आहेच कायम सत्तेत
कष्ट करुन थकलेत
आमचे बाहू
अरे
आभाळा कधी फुटले तूला पाझर
कधी भरेल माझ्या मायभूमीची
घागर
चातकापरी बघतो
मी पावसाची वाट
कधी भेटेल
माझ्या पोरांना
सुखाचा घास
करतात लोक
पाण्याच राजकारण
त्यापाई तर होतय आमचं मरण
अरे आभाळा कधी फुटेल तूला पाझर
कधी भरेल माझ्या मायभूमीची घागर
रुक्ष गेला रे आषाढ
रुक्ष गेला हा श्रावण
नको बनू रे
तू
आमच्या जीवनातला रावण
आशा आहे मनात बरसेल रे तू
डोक्यावरील कर्ज माझ्या फेडशील तू .......
- आरती माळवदे
व्दितीय वर्ष
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी..
Comments
Post a Comment