व्यापारी शेत-करी


 शेती व्यवसाय होता, बळीराजा व्यावसायिक होता तू, 
मातीचा देह तुझा रुद्धय पाझरते तुझे व्यापारी नाही होऊ शकला तू? 

 शेतीचे झाले व्यापारीकरण, विठ्ठल होता तू
 विठ्ठलच राहिला, व्यापारी नाही होऊ शकला तू? 
 शेतमाल विकण्यासाठी जेव्हा बाजार मांडतो तू,
 विकण्यासाठी आवाजाचा आकांडतांडव करतो तू, 
ग्राहक जेव्हा देवासारखा तुज्या समोर येतो, 
हात जोडून खुशाल दोन पैसे कमी घेतो तू?

 दुकानात गेलास तर, व्यापारीच्या भिंतीवर असते 
आज नगद कल उधार तू, परंतु तुझे उलटे असते 
सगळे बाबा जसे आज उधार, कल नगद घेतो तू? 

शेतमालाचा बाजार भाव वाढला, कणा ताठ 
मानेने उभा राहतो तू, शेतमाल बाजार भाव पडला
डोळ्यात पाणी आणून रडतो तू?

आधुनिक शेत आणि व्यापार आपल्या मुलांना
यावा यासाठी कृषी महाविद्यालयात त्यांना घालतो तू, 
परंतु शिक्षण घेऊन जेंव्हा मुलगा तुला सोडून 
जातो तरी आशीर्वाद देतो तू? 

 उतणार नाही मतणार नाही घेतला वसा टाकणार 
नाही एकटाच लढतो तू, परंतु लढता लढता मृत्यू
 आला तरी बलिदान दिले म्हणून गणला जात नाही तू? 

 म्हणून सांगतो तुला शेतकरी दादा एकत्र येऊन 
गट शेती करशील का तू, शहाराकडे जाणाऱ्या 
नवयुवकांच्या रस्त्याला बार लावणार का तू? 

प्रा. ऋषिकेश औताडे
प्राचार्य, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी..

Comments

Popular posts from this blog

माणिक सिताराम गोडघाटे (कवी ग्रेस)

लोकसाहित्य (UPSC)

प्रथम क्रमांक कविता ( शेतकरी क्रुषीकविसंमेलन )