Posts

Showing posts from August, 2019

कुसुमाग्रज...

विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी,  १९१२  - १० मार्च  १९९९ ) हे  मराठी  भाषेतील अग्रगण्य  कवी ,  लेखक ,  नाटककार  कथाकार व  समीक्षक होते. त्यांनी  कुसुमाग्रज  या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात.  वि.स. खांडेकर  यांच्यानंतर मराठी साहित्यात  ज्ञानपीठ  पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा  मराठी भाषा गौरव दिन  अथवा  मराठी राजभाषा दिवस  म्हणून साजरा केला जातो. मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्त्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्...

कवी गुलजार...

Image
सहा वर्षाचे असताना गुलजार यांनी आपली जन्मभूमी सोडली आणि वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांना आपल्या मायदेशी परतण्याची संधी मिळाली. एवढ्या वर्षात गुलजार यांनी अनेक लेखन केलं. आणि त्यांच्या त्या प्रत्येक लेखनातील अनोखी नजाकत वाचकांनी उचलून धरली. गुलजार से अलग कुछ नहीं माझी प्रत्येक रचना मग ती नज्म असो, शायरी असो, गोष्ट असो वा कविता असो ती माझ्यापेक्षा वेगळी असूच शकत नाही. मी जे लिहीतो किंवा लिहीण्यासाठी मी जे शब्द निवडतो खरं म्हणजे मी त्याच शब्दांमध्ये असतो. रोजचं जीवन हे माझ्या लिखाणाचं मूळ आहे. आणि इथूनच मला लिखाणाची प्रेरणा मिळते. हे शब्द मला ऊर्जा ही देतात आणि आनंद ही. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या गुलजार साहेबांच्या ११ अनोख्या रचना  आधे पौने पूरे चाँद, जितना था सब माल गया बारह महीने जमा किए थे जेब काटकर साल गया - गुलजार

माणिक सिताराम गोडघाटे (कवी ग्रेस)

कवी ग्रेस हे मराठी कवितेच्या प्रांतावर मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी…’ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस. त्यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला. माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांची मर्ढेकरोत्तर नव कवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये गणना होते. ग्रेस मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील सैन्यात होते. नागपुरातील कर्नल बाग परिसरात त्यांचं बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं. आईच्या अकाली निधनामुळे नोकरी व शिक्षण यांच्यात मेळ साधत त्यांना आपली प्रतिभा जपावी लागली. १९६६ मध्ये ते नागपूर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए. झाले. त्यानंतर दोन वर्षं त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजमधे अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. १९६८ पासून १९९७ साली निवृत्त होईपर्यंत ते नागपूरमधील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. निवृत्तीनंतर काही काळ ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागात सौंदर्यशास्त्र या विषयाचं अध्यापनही करत होते. ग्रेस यांच्या लिखाणाला सुरुवात झाली १९५५ सालापासून. ‘छंद’, ‘सत्यकथा’ या नियतकालिकांमध...

लोकसाहित्य (UPSC)

लोकसाहित्य लोकमानसाचे विविध वाङ्‌मयीन, सांस्कृतिक, कलात्मक आविष्कार या संज्ञेने सूचित होतात. ‘फोकलोअर’ या अर्थी मराठीत लोकसाहित्य वा लोकविद्या या संज्ञा रूढार्थाने वापरल्या जातात व त्यांचा आशय कित्येकदा परस्परव्याप्त असल्याचे दिसून येते. पश्चिमेकडे ‘फोकलोअर’ची संकल्पना सर्वप्रथम समाजशास्त्र व मानवशास्त्र यांच्या अभ्यासातून निर्माण झाली. स्वाभाविकच फोकलोअरचा अभ्यास हा लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणून सांस्कृतिक मानवशास्त्र (कल्चरल अँथ्रपॉलॉजी) याच नावाने प्रारंभीच्या काळात झालेला आहे. फोकलोअरमध्ये लोकसंस्कृतीच्या जडणघ़डणीतील शाब्द साधने (वाच्यार्थाने वाङ्‌मय-लिटरेचर) व शब्देतर साधने (रूढी, चालीरीती, पारंपरिक कला, कारागिरी, क्रीडा, ज्योतिष, वैद्यक इ.) या सर्वांचाच समावेश झालेला आहे. तरीरी मानवशास्त्रज्ञांत याविषयी एकमत नाही. काहींच्या मते फोकलोअर म्हणजे संस्कृतीमधील केवळ पारंपरिक शाब्द साधनेच होत. असे असले तरी, एकूणच समग्र संस्कृतीची जडणघडण होण्याच्या मुळाशी संस्कृतीमधील शाब्द साधने व शब्देतर साधने या सर्वांचाच मूलभूत व सर्वगामी सहभाग असल्याचे भान एकोणिसाव्या शतकातील अभ्यासकांना आले व ...

बोधकथा...

संवाद सर्वसामान्यांचा......  "व्यक्ती" अथवा संस्थानी समाजास उपयुक्त ठरतील अशा सामाजिक कर्तव्यांच निर्वहन करण्याची 'नैतिक" जबाबदारी आपण स्विकारायला हवी... प्रख्यात धन्वंतरी डॉ. ह.वि.सरदेसाई यांचे विचार म्हणजे सामान्य माणसाला थोर व्यक्तीमत्वां इतक आदर्श होता येणार नाही कदाचित पण त्यांच्या मार्गावरील गवताचं एखादं पात व्हावं असं अनेकांप्रमाण मला देखील वाटतं,आज हे लिहीण चालू करून समाजासाठी काही तरी करण्यासाठी एक आत्मविश्वास मला आजपासून मिळेल  म्हणून आजची पहिली कथा आपल्यासाठी... ....✌😊 बाई मोलकरीण म्हणुन एका राजमहालात काम करत असते. तिला लहान मुलगा असल्याने ती त्याला तिच्या सोबतच कामाला येतांना घेऊन यायची. एक दिवस त्या मुलाला खेळता खेळता राजमहालात हिरा सापडतो, तो मुलगा तो हिरा घेऊन पळत आईकडे जातो आणि सांगतो की, "आई बघ मला हिरा सापडला !" मोलकरीण हुशार असते. तिला वाटते, हा हिरा घेऊन आपण राजमहालाबाहेर जाऊ शकणार नाही ! ती मुलाला म्हणते, "नाही रे ! काच आहे, हा हिरा नाही.", असे म्हणुन ती तो हिरा बाहेर फेकुन देते. काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्...